असणाऱ्या 24 एकादशी पैकी आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे. मराठी महिन्यातील आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीस 'आषाढी एकादशी' म्हणतात. तर चातुर्मास या एकादशी पासून सुरु होतो. या एकादशीला 'देवशयनी एकादशी' असेही म्हटले जाते कारण या दिवशी देव झोपतात.
1 जुलै रोजी यावर्षी आषाढी एकादशी आहे. जर वर्षी महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यामधून भरपूर भाविक विठुरायाच्या नामाच्या गजरात आषाढी एकादशीला पंढरपूरला पायी चालत जातात. यालाच 'आषाढी वारी' म्हणतात. (पण यावर्षी लॉक डाऊन असल्याने शक्य नाही).
सोशल मीडिया द्वारे आपण व्हॉट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्राम, शेअरचॅट, हॅलो यांसारख्या शुभेच्छा देऊन आषाढी एकादशीचा साजरी करू शकता. चला तर यासाठी आपणास खास मराठमोळे शुभेच्छा संदेश, ग्रिटींग्स, शुभेच्छापत्रं...
आषाढी एकादशी शुभेच्छा
विठ्ठल विठ्ठल
नाम तुझे ओठी
पाऊले चालती
वाट हरीची...
नाद पंढरीचा
साऱ्या जगा मधी...
चला जाऊ पंढरी
आज आषाढी एकादशी...
आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आषाढी वारी शुभेच्छा
जातां पंढीरीसी सुख वाटे जीवा
आनंदे केशवा भेटतांचि
या सुखा उपमा नाही त्रिभुवनी
पहिली शोधोनी अवघी तीर्थे
आषाढी एकादशीच्या विठ्ठलमय शुभेच्छा!
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख
पाहीन श्रीमुख आवडीने|
आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!
देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई
सुखालाही आला या हो आनंदाचा पूर
चालला नामाचा गजर| अवघे गरजे पंढरपूर||
आषाढी एकादशीच्या भक्तीमय शुभेच्छा!
0 टिप्पण्या